भुसावळात कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी कक्षाची स्थापना
भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांना बेड मिळवताना कसरत करावी लागते आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातलगांच्या मदतीसाठी भुसावळ शहर शिवसेनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील व पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कक्ष स्थापना केली आहे.
कक्षाच्या सहाय्यातून रुग्णांसह नातेवाईकांना मदत
कोरोना सहायता कक्षाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करण्यात येणार आहे. तसेच शासकीय दरानुसार बिलांची पडताळणी करण्यात येईल. कक्षाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये कोरोनाविषयी जागृती केली जाईल. तसेच विविध रुग्णालयातून रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवण्याचे काम केले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कक्षात सोशल डिस्टन्सचे पालन करीत नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले जाईल. अशी माहिती शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी दिली. शहरात कोरोना सहायता कक्षामध्ये शहरप्रमुख बबलू बर्हाटे (9823321999), उपशहरप्रमुख पवन नाले (9270082122), धनराज ठाकूर(9067891192), गोकुळ बाविस्कर (9511693179), शरद जोहरे यांचा समावेश आहे. नुकतेच काही रुग्णांना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचारासाठी दाखल केल्याचे सांगण्यात आले.

