भुसावळात 19 रोजी रक्तदान शिबिर
भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 30 व्या जयंती निमित्त तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था, गोपाल युवा बिग्रेड रक्तदाते व डॉ.बी.आर.आंबेडकर फाऊंडेशन यांच्यावतीने सोमवार, 19 रोजी सकाळी 10 ते दुपारी एक दराम्यान ब्राह्मण संघातील नेत्रम हॉस्पीटलमध्ये नेत्रम रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक दात्यांनी रक्तदान करण्यासाठी राजश्री नेवे (9890021889), निलेश फंड (8605060547) व राहुल पांडव (9579321810) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.



