भुसावळात महामानवास भाजपा पदाधिकार्यांनी केले अभिवादन
भुसावळ : भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त भुसावळ भाजपा पदाधिकार्यांनी जुन्या पालिका कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी नगराध्यक्ष युवरात लोणार, नगरसेवक राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सरचिटणीस रमाशंकरजी रामप्यारे दुबे, सरचिटणीस संदीन सुरवाडे, उपाध्यक्ष बिसनजी दा गोहर, उपाध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष शंकरजी शेळके, अलका शेळके, विशेष आमंत्रित सदस्य राहुल तायडे, दिनेश दोधाणी, संजय बोचर, नंदकिशोर बडगुजर, प्रशांत भट, अथर्व पांडे, सागर महाजन आदींची उपस्थिती होती.



