कळमोद्यात स्वर्ग रथाचे गुढीपाडव्याच्या दिवशी लोकार्पण


फैजपूर : रावेर तालुकयातील कळमोदा रावेर येथे 13 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी स्वर्ग रथाचे लोकार्पण शास्त्री भक्ती किशोर दासजी, नरेंद्रशेठ नारखेडे (फैजपूर), अरुण बाक्षे यांच्या हस्ते करण्यात आले. कळमोदा गावाची स्मशानभूमी फार लांब असल्याकारणाने व त्यातच कोरूनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बर्‍याच वेळा मृतदेह हलवण्यास अडचणी येत होत्या. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कळमोदा येथील अमोल अरुण बाक्षे व परीवार यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री स्व.नलिनी अरुण बाक्षे यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथ श्री विठ्ठल मंदिर, कळमोदा यांना देण्यात आला. कळमोदा गावाला लागून असलेल्या इतरत्र खेड्यांवर त्याची आवश्यकता भासल्यास हा स्वर्गरथ या सर्व ठिकाणी सेवा म्हणून उपलब्ध करण्यात येईल. या स्वर्गरथ लोकार्पण प्रसंगी कळमोदा येथील भास्कर बोंडे, हेमराज बोंडे, हितेश बाक्षे, जगन्नाथ बोंडे, पप्पू चौधरी ,नितीन पाटील ,बबलू महाजन, प्रशांत नारखेडे, पवन सराफ यांच्यासह तरुण दुर्गा उत्सव मित्र मंडळ कळमोदा यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !