भुसावळात चोरट्यांची शिरजोरी : दोन दुकाने फोडली


भुसावळ : पोलिसांची गस्त भेदून शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी किराणा दुकाने फोडली. या चोरीत सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल लंपास झाला. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दितील ज्ञानदीप सुपर शॉप आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दितील सुनील प्रोव्हीजन हे दोन दुकाने फोडण्यात आल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली.

दोन ठिकाणी चोर्‍या
शहर हद्दीतील जळगाव रोडवरील मरीमातेच्या मंदीराजवळील ज्ञानदिप सुपर शॉप या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील एक लाख 50 हजार रुपयांची रोकड लांबवण्यात आली. सीसीटिव्ही कॅमेर्‍यात चोरटा कैद झाला. आहे.चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यात असलेले दिड लाख रूपये लांबवले. सीसीटिव्ही कॅमेर्‍यात आलेला संशयीताला महात्मा फुले नगर मधून ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे



डीवायएसपी यांची घटनास्थळी भेट
जुना सतारा भागातील या दुकानात झालेल्या चोरीची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटिव्ही फुटेजची पहाणी केली, पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्यात. यावेळी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षक इरफान काझी उपस्थित होते.

बाजारपेठ हद्दीतही चोरी
शहरातील तेली मंगल कार्यालयासमोरील सुनील प्रोव्हीजन या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत गल्यात ठेवलेले 13 हजार 500 रुपये लांबवले. सकाळी येणार्‍या व्यापार्‍यांना रक्कम दयायची असल्याने ही रक्कम दुकानात ठेवली असल्याचे दुकानाचे मालक गिरीधारीलाल बजाज यांनी सांगितले. डीवायएसपी वाघचौरे यांनी या चोरीची माहिती जाणून घेतली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !