नाडगाव शिवारातील कुट्टी शेड जळून खाक
बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथील सुमनबाई रामा आसने यांच्या गट क्रमांक 216 मधील कुटीचे शेड व शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना 13 रोजी घडली. आगीत दोन कोंबड्या, ठिबक 9 ते 10 पाईप शेडवरील नविन पत्रे व शेड मधील संपूर्ण कुट्टी जळाली. कोंबड्यांचे खुराडे ,कलरचे डब्बे व इतर शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने 25 ते 30 हजार रुपये नुकसान झाले आहे. कोरोना महामारीने आधीच संकटामध्ये आलेले शेतकरी सुमनबाई आसने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बजाज फायनान्सने माझ्या मुलाने एक लाख रुपये कर्ज काढून कुट्टी साहित्य पत्राशेड तयार केले होते आणि शेती उपयोगी वस्तू शेडजवळ असल्याने आगीत जळून खाक झाले आहे. सद्यस्थितीमध्ये बैल, म्हैस त्यांना खायला कुट्टी नसल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



