मनवेलला स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी पुण्यतीथी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम
मनवेल : हजारो भाविकांचे श्रध्दास्थांन असलेल्या श्री रेवानंद स्वामी यांच्या श्राध्द सोहळ्यांचे सोमवार, 23 सप्टेंबर रोजी मनवेल येथील धुनीवाले दादांजी दरबारात आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी अविधवा नवमीला स्वामी रेवानंद गुरुकेशवानंद धुनीवाले दादांजी यांचा श्राध्द सोहळा मनवेल ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदाच्या सोहळ्यांची तयारी पूर्णत्वांकडे आली असून मनवेल गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सोमवार, 23 रोजी सकाळी 7 वाजता आरती, आठ वाजता सेवा, 10 वाजता होम, हवन सेवा व दुपारी 12 वाजेपासून महाप्रसाद तसेच सायंकाळी चार वाजेपासून गावात पालखी मिरवणूक व रात्री 8 वाजता महाआरती व 10 वाजेपासून रात्रभर भजन गायनाचा कार्यक्रमाचे होणार आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
या सोहळ्यानमित्त साकळी, मनवेल मोफत प्रवास, साकळीतील बापू धोबी यांच्याकडून शिरा-पोहे वाटप, मनवेल येथील महर्षि वाल्मीक मित्र मंडळा कडुन पोहे वाटप, विठ्ठल मंदिराजवळ चहा वाटप व रत्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 हजार भाविक दरवर्षी येथे हजेरी लावतात तर वरण-पोळी व गंगाफळाची भाजी असा महाप्रसाद भाविकांना दिला जातो. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.गावातील तरुण मंडळी दादांजी भजनी मंडळ व ग्रामस्थ सोहळ्यांची तयारीत गुंतले आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादाजी भजनी मंडळ व मनवेल ग्रामस्थांनी केले आहे.