बोदवडमधून चोररट्यांनी दुचाकी लांबवली
बोदवड : शहरातील मणियार मोहल्लयातून 13 रोजी 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याप्रकरणी शुक्रवारी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. नशिराबाद येथील रहिवासी तनवीर बिस्मिल्ला मणियार हे बोदवड येथील मणियार मोहल्यातील त्यांचे काका शफिक मणियार यांच्याकडे आले होते. 13 रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तन्वीर यांची शफिक मणियार यांच्या घरासमोर लावलेली 50 हजार रुपये किमतीची यामहा गाडी (एम.एच.19 सी.सी.1786) चोरून नेली. इतरत्र शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळून न आल्याने तनवीर मनियार यांनी शुक्रवार, 16 रोजी बोदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.



