शासनाच्या शिव भोजनाचा आस्वाद घेणार्या लाभार्थींना ‘दिलासा’
रावेर : शासनाच्या शिव भोजनाचा आस्वाद घेणार्या लाभार्थींना अच्छे दिन आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्यात शिव भोजनाची थाळी दरोरोज 150 व्यक्तीनां देण्याचा आदेश केला आहे. गुरुवारपासून याचा लाभ घेतला जात येत असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहेे.
थाळी खपाच्या उद्दीष्ट दिड पट वाढ करण्याचेही निर्देश
सद्य परीस्थितीत जळगाव जिल्ह्यायासाठी एकूण 3500 थाळीखपाचा उद्दीष्ट मंजूर करण्यात आलेा आहे. गरीब व गरजू व्यक्ती तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादींच्या जवेणा अभावी हाल आपेष्टा होऊ नये यासाठी 15 एप्रिल , 2021 पासुन पुढील एक महिन्यापर्यंत शिवभोजन थाळी नि : शुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी तसेच शिवभोजन केंद्रांना यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या थाळी खपाच्या उद्दीष्ट दिड पट वाढ करण्याचेही निर्देश देण्यात आहेत.



दररोज 200 थाळी करण्याची राष्ट्रवादीची मागणी
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दरोरोज 150 शिव भोजन थाळी देण्याचे आदेश असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नीळकंठ चौधरी, युवक शहराध्यक्ष प्रणीत महाजन यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन ही थाळी दरोरोज 200 लाभाथींना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
