बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर मार्गाचे काम संथ गतीने : जि.प.अध्यक्षांचा संताप


यावल : अनेक दिवसांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या बर्‍हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याबाबत जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी कामाबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त करून ठेकेदारांशी संबंधित लोकांना धारेवर धरल्याने खळबळ उडाली. यावल शहरातून जाणार्‍या अंकलेश्वर ते बुर्‍हाणपुर या राज्य मार्गावरील यावल बस बसस्थानकापासून ते वनविभाग कार्यालयापर्यंतचा रस्ता हा ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने खराब झाला होता, प्रसंगी या मार्गावर अनेक अपघात देखील घडले होते. या मार्गावरील खराब झालेल्या रसत्याबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या म्हणुन या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील पत्रव्यवहार केला होता. या रस्त्याचे काम भुसावळच्या एका ठेकेदाराला दिल्याने संबंधित ठेकेदाराकडून शासनाच्या निविदा मधील अटीशर्तीच्या अधीन राहुन काम करीत नसल्याने जिल्हा परीषद गटनेते व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास या मार्गाचे काम सुरू असतांना कामाला भेट देत संताप व्यक्त केला.

डांबराऐवजी खडीचा सर्रास वापर
संबंधीत ठेकेदाराकडील माणस हे रस्त्यावर डांबर न टाकता खडीचा सर्रास वापर करून अत्यंत निकृष्ठ प्रतिचे काम करण्यात येत असल्याची बाब त्यांच्या निर्दशनास आल्याने त्यांनी ठेकेदारांची माणस आणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांना चांगलेच धारेवर धरले व कामाची गुणवता सुधारण्याचे निर्देश दिलेत. काम हे ठेकेदाराच्या वतीने बिओटी तत्वावर सुरू करण्यात आले असुन , या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी ही पाठपुरावा करून कामास तात्काळ करण्यास सांगीतले होते. यावेळी जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी सांगीतले की., आपण या कामाच्या गुणवंत्तेबाबत वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार आहोत.
यावेळी इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह व आदी कार्यकर्ते होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !