महेलखेडीत श्री सप्तश्रृंगी माता मंदिरातून 70 हजारांचे दागिने लांबवले


यावल : तालुक्यातील महेलखेडी येथील श्री सप्तश्रुंगी माता मंदीरातील मूर्ती चा अंगावरील सुमारे 70 हजारांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे. महेलखेडी, तालुका यावल येथील मंदीरात 17 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महेलखेडी गावाचा चौकातील अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मंदीरातील मूर्तीचा अंगावरील 20 ग्रामच्या सोन्याची सुमारे 70 हजार रुपये किमतीचे सोन्याची पोत श्री सप्तश्रुंगी माता मंदीराचे लोखंडी दार तोडून लांबवल्याने भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, गावातील भाविक बाळु राजु झुरकले हे सकाळी मंदिरात पूजा अर्चनेसाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या निर्देशनास आला यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजपुर मुजफ्फर खान, पोलीस अमलदार सिंकदर तडवी यांनी भेट घेवुन मंदीराचे विश्वत अध्यक्ष आंनदा शिवराम येवले, उपाध्यक्ष नामदेव आसाराम झुरकले व रितेश अर्जुन महाजन, प्रमोद हरी महाजन, शेलेश महाजन व ग्रामपंचायत सदस्य यांची भेट घेतली. यावल पोलिसात विश्वतांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अंमलदार सिंकदर तडवी हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !