कोरोना : पुन्हा जळगाव जिल्ह्यात 22 मृत्यू तर 24 तासात 1059 बाधीत आढळले


एकाच दिवसात 1074 रुण्गांची मात : मृतांची संख्या पोहोचली 1931 वर

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून रविवारीदेखील 22 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून 1059 बाधीत आढळले आहेत तर 24 तासात 1074 रुग्णांनी कोरोनावर मात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 9 हजार 277 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 96 हजार 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 931 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 1074 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू ओढवल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.

रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 190
जळगाव ग्रामीण 12
भुसावळ 161
अमळनेर 22
चोपडा 132
पाचोरा 66
भडगाव 52
धरणगाव 42
यावल 65
एरंडोल 67
जामनेर 68
रावेर 39
पारोळा 37
चाळीसगाव 35
मुक्ताईनगर 08
बोदवड 49
अन्य जिल्हा 13



24 तासात 22 रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात 24 तासात पुन्हा 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 54, 62, 70 वर्षीय पुरूष व 50, 70, 70, 81 वर्षीय महिला

एरंडोल तालुक्यातील 60, 70, 75 वर्षीय पुरूष व 60 वर्षीय महिलेचा

पारोळा तालुक्यातील 55, 55 व 60 वर्षीय पुरूष

जामनेर तालुक्यातील 51 वर्षीय पुरूष व 83 वर्षीय महिला

भुसावळ तालुक्यातील 69 वर्षीय पुरूष व 60 वर्षीय महीला

अमळनेर तालुक्यातील 65 वर्षीय महिला

जळगाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरूष

मुक्ताईनगर तालुक्यातील 58 वर्षीय पुरूष

भडगाव तालुक्यातील 42 वर्षीय महिला



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !