निवासी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य रो.पांडुरंग राव यांचा गौरव


भुसावळ : आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजसेवेसाठी ख्यातीप्राप्त संस्था रोटरी क्लबच्या प्रांत 3030 ने विविध क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरी केल्याबद्दल निवासी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य रो.पांडुरंग राव यांचा गौरव करण्यात आला. प्रांत 3030 चे प्रांतपाल रो. शब्बीर शाकिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकताच रो.पांडुरंग राव यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. धर्मेंद्र मेंडकी यांनी रो.पांडुरंग राव यांचा परीचय दिला. पुरस्काराला उत्तर देताना पांडुरंग राव यांनी सांगितले की, आपण आयुष्यभर कुठल्याच कौतुकाची अपेक्षा आणि लाभाचा मोह न धरता समाजाच्या आणि माणुसकीच्या भले करण्याचे उद्दीष्ट ठेवून वाटचाल केली आहे.

योग्य व्यक्तीचा गौरव : गजानन ठाकूर
रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.गजानन ठाकूर आणि सचिव रो.गिरीश कुलकर्णी म्हणाले की, पांडुरंग राव यांना मिळालेला सन्मान ही क्लबच्या दृष्टीनेच नाही तर एकूणच समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. राव साहेबांचे कर्तुत्व एखाद्या पुरस्करापेक्षा कैकपट मोठे असले तरी योग्य व्यक्तिला योग्य बहुमान मिळाल्याचा आनंद काही औरच आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !