भुसावळात नियम मोडणार्यांवर कारवाईचा धडाका कायम
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदीचे उल्लंघण करणार्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे, रविवारी संचारबंदीचे उल्लंघण करणार्या 69 तर विना मास्क, वाहन चालवण्याचा परवाना नसते, सोबत कागदपत्र न बाळगणे आदी कारणांमुळे 208 वाहनधारकां विरुद्ध दंडात्मक कारवाई करीत 76 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारने कडाक निर्बंध लावले आहे मात्र तरीही याकडे दुर्लक्ष करून संचार बंदीचे उल्लंघण करणार्या 69 जणांविरुद्ध पोलीस आणि पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. काहीही कारण नसताना फिरणार्या 69 जणांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड केला आहे तर गाडी चालवताना परवाना सोबत नसणे, गाडीचे कागदपत्रे नसणे, तीन शीट चालवणे आदी कारणांवरून 208 वाहनधारकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि बाजारपेठ आणि शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करीत प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड वसूल केला आहे असा एकूण 76 हजार 100 रुपयाचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
कारवाई कायम सुरू राहणार
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेल्या चार दिवसांपासून दंडात्मक कारवाईची धडक मोहीम राबवित आहे. भुसावळ कर नागरीरकांनी संचारबंदीचे उल्लंघण करू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.



