अहिरवाडीतील तरुणीवर अत्याचार : आरोपीला कोठडी


रावेर- तालुक्यातील अहिरवाडी येथील युवतीस लग्नाचे आमिष दाखवून व भावास जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अहिरवाडी येथील 20 वर्षीय युवतीस केर्‍हाळे येथील जितेंद्र शांताराम महाजन (39) हा गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे अमीष दाखवत होता. तुला आयुष्यभर सांभाळेल व कुणाला याबाबत सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकेल, समाजात तुझी बदनामी करेल. अशा धमक्या आरोपीने देत युवतीवर दोन वेळा अत्याचार केला. याबाबत युवतीने रावेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल. आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास उपनिरीक्षक सुनील कदम, निलेश चौधरी, विकास पहुरकर, महिला पोलीस रईसा तडवी करीत आहेत.


कॉपी करू नका.