माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंनी घेतली राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांची भेट !
मुंबई : गत सोमवारपासून मुंबईत असलेल्या माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती होती. नेत्यांमधील चर्चेचा नेमका तपशील कळू शकला नसलातरी ज्येष्ठ नेते पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात ही भेट घेण्यात आल्याचे समजते तर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय घडा-मोडींबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

