माझा वाळूचा धंदा नाही मात्र नारायण राणेंची हर्या-नार्याची गँग : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला
जळगाव : माझा वाळूचा धंदा असल्यास ते सिद्ध करावे मात्र नारायण राणे यांची हर्या-नार्याची गँग होती, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे लगावला. जळगावात आलेल्या निलेश राणी यांनी पालकमंत्र्यांवर वाळूचा धंदा असल्याचा आरोप केला व या संदर्भात पालकमंत्र्यांना माध्यमांनी छेडले असता ते बोलत होते.
वाळूचा धंदा असल्यास सिद्धा करावे
माजी खासदार नीलेश राणे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परीषद घेतल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाळूचा धंदा असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात पालकमंत्र्यांना छेडले असता ते म्हणाले की, आरोप साफ चुकीचा आहे. आपला वाळूचा धंदा असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे त्यांना आपले खुले आव्हान आहे. आपला वाळूचा धंदा नाही. मात्र, नीलेश राणे यांच्या वडिलांची हर्या-नार्याची गँग होती, असे पालकमंत्र्यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

