भुसावळात मतदार जागृतीसाठी व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम
भुसावळ- भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात निवडणूक आयोगाद्वारे मतदारांना जनजागृती करण्यासाठी व्ही.व्ही.पॅटस् मशीनसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण उपक्रमासाठी राज्यशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.शुभांगी राठी व प्रा. चेतन अमोदकर यांनी सहकार्य केले. यादी क्रमांक 14, 15 व 16 यांचे अनुक्रमे बी.एल.ओ. रेखा चौधरी, एम. पी.नेहते आणि हेलोडे यावेळी उपस्थित होते.
72 विद्यार्थिनींना प्रशिक्षण
या प्रशिक्षण पथकात पथक प्रमुख म्हणून आर.एन.चौधरी, एफ.वाय.तडवी, एम.एस.राजपूत, एस.आर.शेख व पोलीस नाईक एन.जे.वाणी यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. महाविद्यालयातील 72 विद्यार्थिनींनी हे प्रशिक्षण अवगत केले. याच प्रशिक्षणातून आपण कोणत्या उमेदवाराला मत दिले हे त्यांनी जाणून घेत समाधान व्यक्त केले.