खासदार नवनीत कौर यांना हायकोर्टाचा दिलासा


नवी दिल्ली : जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने अमरावतीच्या खासदार नवनवीत कौर राणा यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्दबातल ठरविण्याचा निकाल दिल्याने नवनीत कौर यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे जाहीर केले होते. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जात पडताळणी करण्याचा अधिकार हा जात पडताळणी समितीचा असल्याने हे प्रकरण संबंधीत समितीकडे पाठविणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !