माजी गृह मंत्री अनिल देशमुखांना ईडीचे पुन्हा समन्स
मुंबई : माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते मात्र देशमुख ईडी कार्यालयात पोहोचू न शकल्याने वकीलांमार्फत कोणत्याही दुसर्या दिवशी हजर राहण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. दरम्यान, ईडीने आता पुन्हा देशमुखांना समन्स पाठवत मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात आरोप झाल्यानंतर देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

