भावजयीवर बलात्कार करणार्या दिराला पडल्या बेड्या
पुणे : 24 वर्षीय विवाहितेवर दिरानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना रामटेकडी भागात घडली. पतीशी वाद झाल्यानंतर पीडीता माहेरी आली असता आरोपी दिराने 12 फेब्रुवारी रोजी सासरी घेवून जाण्यासाठी आलो असल्याचे सांगून घरात प्रवेश केला. याचवेळी विवाहितेचे तोंड दाबून काहीच बोलायचे नाही, आरडा-ओरडा केल्यास जीवे ठार मारेल, असे सांगत अत्याचार केला. विवाहितेने जीवाच्या भितीने तक्रार देणे टाळले मात्र नंतर या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. आरोपीस अटक करण्यात आली.