पोलिस निरीक्षकाकडे 17 लाखांची बेहिशोबी मालमत्ता
मुंबई : क्लब सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक शंकर पुजारी यांच्यावर एसीबीने कारवाई केली होती. एसीबीच्या तपासात निरीक्षक शंकर पुजारीने गेल्या 15 वर्षांत 16 लाख 90 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करत आहेत. मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना 2015 मध्ये पुजारीवर एसीबीचा ट्रॅप झाला होता. दरम्यान, पुजारीने 1 जानेवारी 2000 ते 24 नोव्हेंबर 2015 या सेवा कालावधीत एकूण उत्पन्नापेक्षा 28.57 टक्के जास्तीची मालमत्ता जमा केली आहे.