सहा हजारांची लाच भोवली : टाकळी तलाठी एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या खाते वाटपाची सातबारा उतार्यावर नोंद घेण्यासाठी सहा हजारांची लाच मागणार्या नांदगाव तालुक्यातील टाकळी बु.॥ येथील तलाठ्यास नाशिक एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने महसूल वर्गात मोठी खळबळ उडाली. विलास विठ्ठल बागुल (42) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
लाच स्वीकारताच अटक
तांदळवाडी येथील 32 वर्षीय तक्रारदार यांचे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या खाते वाटपाची सातबारा उतार्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी विलास बागुल यांनी सोमवारी सहा हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्याने सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच आरोपी तलाठ्यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, प्रवीण महाजन, गोसावी, गांगुर्डे यांनी हा सापळा यशस्वी केला.