कुविख्यात दरोडेखोरांचे टोळके जाळ्यात


पुणे : कोथरुडमधील एका सोसायटीत दरोडा टाकण्यासाठी शिरलेल्या सहा जणांच्या टोळक्यांपैकी दोघांना नाईट राऊंडवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करुन धाडसाने पकडले. बल्लुसिंग प्रभूसिंग टाक आणि उजालासिंग प्रभूसिंग टाक (दोघे रा. रामटेकडी, वानवडी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. बल्लुसिंग याच्यावर 63 आणि उजालासिंग याच्यावद 72 गुन्हे प्रलंबित आहेत.

पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या
वरीष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, निरीक्षक बाळासाहेब बडे, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सांगुर्डे, स्वप्निल गायकवाड, वैभव शिंदे, दत्ता चव्हाण, मनोहर कुंभार, सुरज सपकाळे, विकास मरगळे, गणेश भाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !