माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक


मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथीराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याने ाज्यात खळबळ उडाली आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी सकाळी ईडी कार्यालयात बोलविण्यात आले आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हा एकनाथ खडसे यांना हा मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !