बुलढाण्यात तलवार मोर्चा निघणारच : जगन सोनवणे
आमदार संजय गायकवाडांची आमदारांची रद्द व्हावी ही एकची मागणी
भुसावळ : अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणार्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी दिला आहे. गायकवाड यांच्या प्रतिमेला अंडे मारण्यात आल्यानंतर सोनवणे यांच्यासह पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल झाले. बुधवारी बाजारपेठ पोलिसात सोनवणे यांनी हजेरी लावली व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमदार गायकवाड यांची आमदारकी आता रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. 12 रोजी बुलढाण्यात तलवार मोर्चा काढून असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला.

