आता कुणाला काय सीडी लावायची ती लावा ; भाजप आमदार अतुल भातखळकरांचा माजी मंत्री खडसेंना टोला
मुंबई : भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. आता या मुद्यावरून भाजपा आमदार अतुल खातखळकर यांनी एकनाथराव खडसेंवर खोचक टीका केली आहे. आता कुणाला काय सीडी लावायची, ती त्यांनी लावावी, असे त्यांनी म्हटले आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आताच्या सत्ताधार्यांनीच सुरू केली होती त्यामुळे ईडी आता या प्रकरणाचा तपास करीत आहे. मुळात कर नाही त्याला डर कशाला? अशी विचारणा करत आता कुणाला काय सीडी लावायचेय ती त्यांनी लावावी, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

