माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावली : मुंबईतील पत्रकार परीषद रद्द
मुंबई : भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर ते गुरुवारी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार होते व तत्पूर्वी सकाळी 10 वाजता पत्रकार परीषद घेवून संबोधीत करणार होते मात्र बुधवारी रात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने मुंबईतील पत्रकार परीषद रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी पक्षाने अधिकृतरीत्या ट्वीटद्वारे कळवले आहे.
हे देखील वाचा : माजी मंत्री एकनाथराव खडसेंना ईडीचे समन्स



खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
भोसरी जमीन प्रकरणात ईडीने चौकशी केल्यानंतर माजी मंत्री खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने खडसे यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले आहेत.

