नऊ तासांच्या सखोल चौकशीनंतर माजी मंत्री खडसे ईडी कार्यालयातून पडले बाहेर


मुंबई : नऊ तास झालेल्या सखोल चौकशीनंतर माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने गुरुवारी हजर राहण्याचे समन्स बजावल्यानंतर खडसे हे सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले होते. खडसे यांचे वकील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही ईडीच्या अधिकार्‍यांना सहकार्य करीत काही कागदपत्रे देखील दिली. यापुढे जेव्हा कधीही ईडी बोलवेल तेव्हा आम्ही हजर राहू,

खडसेंच्या जावयाला कोठडी
एकनाथराव खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली असून त्यांना 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरूवारी एकनाथराव खडसेंना चौकशीसाठी समन्स पाठविल्यानंतर त्यांनी कार्यालयात हजेरी दिली. दरम्यान, ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी खडसेंनी आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता शिवाय मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरू झाल्याचा दावा केला होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !