डॉ.अस्मिता पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश


पाचोरा : पाचोरा दौर्‍यावर आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ.अस्मिता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत त्या प्रवेश करणार असल्याची चर्चा होती व ती या निमित्ताने खरी ठरली. मंत्री शिंदे हे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थानी आले असताना प्रवेश सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !