आठ हजारांची लाच भोवली : मंडळाधिकार्‍यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात


नाशिक : शेतीचा फेरा मंजूर करण्यासाठी आठ हजारांची लाच समनापूर, ता.संगमनेर येथील मंडळाधिकार्‍यास चांगलीच महाग पडली असून लाच स्वीकारताच मंडळाधिकारी व खाजगी पंटराला अहमदनगर एसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या. बाळासाहेब कचरु जाधव (45, प्लाट नं 432, जिजामाता इंग्लिश स्कूलजवळ, मालदाड रोड, आनंद नगर, संगमनेर. जि. अहमदनगर) असे अटकेतील मंडळाधिकार्‍याचे तर मनोज ज्ञानेश्वर मंडलिक (46, माळीवाडा, नेहरू गार्डन जवळ, संगमनेर) असे खाजगी पंटराचे नाव आहे.

आठ हजारांची लाच भोवली
पोखरी हवेलीच्या 29 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारदार यांनी त्यांच्या चुलत्यास शेतजमीन विक्री केली होती. त्याच्या विक्री दस्तमध्ये चुकीचे क्षेत्र नमुू झाले होते व सदर दस्त आधारे शेतीचा फेर नोंद झाला होता व तक्रारदार यांनी सदर फेर रद्द करण्यासाठी अर्ज दिला होता. यातील लोकसेवक यांच्याकडून खरेदीचा फेर मंजूर होण प्रलंबित होते. यातील लोकसेवक यांनी खरेदीचा फेर मंजूर करते वेळेस रद्द लेखाप्रमाणे खरेदी नोंद रद्द करण्याचे काम करून देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी खाजगी इसम यांच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडे सोमवारी 10 हजारांची मागणी करून आठ हजारात तडजोड केली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी समनापूर मंडळ अधिकारी कार्यालय आरोपींना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे, निरीक्षक दीपक करांडे, नाईक चौधरी, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलिस अंमलदार संध्या म्हस्के, चालक हवालदार हरुन शेख. नाईक राहुल डोळसे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !