मुंबई तुंबली : नऊ रेल्वे गाड्या रद्द


भुसावळ : मुंबईसह विभागात सुरू असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाने नऊ रेल्वे गाड्या करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक रद्द झालेल्या गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत. 18 रोजी सुटणार्‍या सात तर 19 रोजी सुटणार्‍या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या झाल्या रद्द
18 रोजी सुटणारी 02188 मुंबई-जबलपूर गरीब रथ, 02169 मुंबई-नागपूर विशेष गाडी, 01141 मुंबई-आदिलाबाद विशेष गाडी, 02105 मुंबई-गोंदिया विशेष गाडी, 07057 मुंबई-सिकंदराबाद विशेष गाडी, 02111 मुंबई-अमरावती विशेष गाडी, 07612 मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष गाडी तसेच 19 रोजी सुटणारी 02811 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटीया एक्प्रेस व 02109 मुंबई-मनमाड विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !