पावसाचे थैमान : रायगड जिल्ह्यात पाच जण वाहिले


रायगड : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे म्हसळा, कर्जत, पनवेल-पोयंजे येथील तीघे जण तर खोपोली क्रांतीनगर येथील दोन लहान मुले वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने शोध कार्य हाती घेतले आहे. कर्जत येथील प्रमोद जोशी (26), पोयंजे येथील दिपक ठाकूर (24) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत, तर म्हसळा आणि क्रांतीनगर येथीन वाहून गेलेल्याची नावे समजू शकलेली नाहीत. पेण तालुक्यात बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे बराच कालावधीसाठी वाहतुक ठप्प झाली होती. पेण तालुक्यातील पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय तट रक्षक दलाच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !