खून करून मृतदेह रेल्वे रूळावर फेकला : तिघांना बेड्या
वर्धा : दहेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. आरोपींनी एकाचा खून करून मृतदेह रेल्वे लाईनीवर फेकला मात्र पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली. ही घटना 18 रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेत दिगंबर नामदेव कन्नाके (50) यांचा मृत्यू झाला होता.
तिघा आरोपींना अटक
मृतक दिगंबर आणि आरोपी संदीप राऊत यांच्यात जूना वाद असल्याने तीन दिवसांपूर्वी दिगंबर हा शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना आरोपी संदीप राऊत, राजू राऊत आणि किशोर राऊत यांनी रस्त्यात अडवून दिगंबरच्या डोक्यात रॉड मारल्याने त्याचा मृत्यू व संशयीतांनी मृतदेह वरुड रेल्वे परीसरात असलेल्या रेल्वे रूळावर टाकला मात्र पोलीस तपासात हा खून असल्याचे उघड झाले.