दिव्यांग तरुणीवर अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा
सोलापूर : घरात एकटी असलेल्या दिव्यांग तरुणीवर दोघा आरोपींनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना सोलापुरात घडली. पीडीतेच्या फिर्यादीनुसार सोहेल इमामसाब आत्तार (कलावती नगर, एमआयडीसी) व गणेश शंकर कोरे (संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणी घरात एकटी आरोपी सोहेल आत्तार याने पीडितेवर अत्याचार केला व त्यानंतर सोहेलचा मित्र गणेश कोरे यानेही अत्याचार केला. सलग चार दिवस ही घटना घडल्यानंतर पीडीतेने 18 जुलै रोजी ही बाब आईला सांगितली. पीडीतेच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.