चाकणच्या एटीएममध्ये स्फोट घडवून 28 लाखांची रोकड लांबवली
चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली गावच्या हद्दीतील पिंजण यांच्या बिल्डिंगमध्ये हिताची कंपनीचे एटीएम मशीन असून मंगळवारी चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनमध्ये स्फोट घडवला होता. या प्रकारात तब्बल 28 लाख रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे समोर आले आहे. मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली होती. तर मशीनच्या फुटलेल्या भागात 10 ते 11 लाख रुपये सुरक्षित राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.