सेलूच्या लाचखोर पोलीस उपअधीक्षकांच्या घरात आढळले 25 लाखांचे घबाड
मुंबई : दिड कोटींची लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सेलूचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल यांच्या मुंबईतील फ्लॅटमधून 24 लाख 84 हजाराची बेहिशेबी रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. पाल यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात ताब्यात घेण्यात आली आहे. दीड कोटी रुपयांच्या लाचेतील 10 लाखाचा पहिला हप्ता घेताना कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी परभणीतील सेलू विभागाचे उपअधीक्षक कार्यालयात अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती.
पोलीस उपअधीक्षकाने मागितली दिड कोटींची लाच : पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात