दुर्दैवाचा फेरा : आधी आई-वडीलांचा मृत्यू नंतर ‘आरती’ही विझली


जळगाव : कोरोनात आधी वडीलांचा व नंतर आईचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील कन्येचाही अचानक झालेल्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. खोटे नगरातील 33 वर्षीय आरती साहेबराव बाविस्कर (33) या तरुणीचा शनिवारी दुपारी 12.30 वाजता स्वच्छतागृहात मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूचे अद्याप कारण समजून आलेले नसून व्हीसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.

कुटुंबावर मोठा आघात
आरती बाविस्कर या खोटेनगरात मोठा भाऊ कुलभूषण, वहिनी प्रतीक्षा व लहान भाऊ शाहू आणि दोन भाच्यांसह वास्तव्यास होत्या. सुमारे दोन कोरोनाने वडीलांचा मृत्यू झाला नंतर आई वैशाली यांचाही मृतयू झाला तर तोच शनिवारी सकाळी आरती घरातील स्वच्छतागृहात बेशुद्ध आढळल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचार सुरू असताना आरतीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे व्हीसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !