प्राध्यापकाला मारहाण करून लुटणारे पाच संशयीत पोलिसांच्या जाळ्यात
शिरपूर : प्राध्यापकाला मारहाण करीत लूट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा शिरपूर पोलिसांनी उलगडा केला असून पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून लुटीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुकेश उर्फ पप्पू कोळी (26), गोरख मखन कोळी (32), दिनेश वसंत जगदेव (30, तिन्ही रा.सावळदे, ता.शिरपूर) व गुन्ह्यात मदत केल्याकामी ईश्वर शिवलाल भोई (42, रा.बहाळ, ता.चाळीसगाव), जुबेर इब्राहिम खाटीक (28, रा.शिंगावे, ता.शिरपूर) अशी अटकेतील आरोपींचे नाव आहेत.
मारहाण करीत अंगठ्या लांबवल्या
सावळदे येथील एस.व्ही.के.एम.संस्थेजवळ प्रा.समीर निरंजन मिश्रा यांना चोरट्यांनी मारहाण करीत त्यांच्या हातातील बोटातील एकूण सहा सोन्याच्या अंगठ्या लांबवल्या होत्या. शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शिरपूर पोलिसांनी आदींनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अटकेतील आरोपींच्या ताब्यातून पाच सोन्याच्या अंगठ्या व युनिकॉर्न मोटरसायकल जप्त करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (धुळे), शिरपूर पोलीस उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे, कॉन्स्टेबल संदीप रोकडे, अभिजीत ढेपे, महेंद्र सपकाळ, अरविंद वाघ, अमोल धिवरे, चालक हरून शेख आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

