उरूळी कांचनमधील हॉटेल मालकाची हत्या : तरुणीला अटक ; तलवारीही जप्त


लोणी काळभोर : रविवारी रात्री 8. 45 वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे (व रा.जावजीबुवाची वाडी, ता.दौंड) हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना त्यांच्यावर तलवारी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. खून प्रकरणात वापरललेया दोन तलवारींसह एका तरुणीला बुधवारी पोलिसांनी अटक केली. काजल चंद्रकांत कोकणे (19, रा.बिबवेवाडी, पुणे) असे अटकेतील संशयीत तरुणीचे नाव आहे. व्यावसायिक वैमन्यस्यातून झालेल्या हत्येप्रकरणी सहभागी असलेल्या आरोपींची एकूण संख्या 11 झाली आहे. अल्पवयीन मुलाने आखाडे यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यासह निलेश आरते हे दोघे दुचाकीवरून काजलकडे गेले व दोन्ही तलवारी तिच्या ताब्यात देण्यात आल्याचा आरोप आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !