आठ महिन्याच्या बालकाचा कुपोषणाने मृत्यू


यावल : यावल तालुक्यातील वडरी धरण तांड्यावरील आकाश जवानसिंग पावरा (8 महिने) या बालकाची गेल्या आठ दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला यावल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ते बालक कुपोषित असून त्याला श्वास घ्यायला देखील त्रास होत असल्याने डॉ. अक्षय लाडगे यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवले. याठिकाणी बालरोग तज्ज्ञ डॉ.अतुल गाजरे यांनी उपचारास सुरूवात केली मात्र काहीच वेळात बाळाचा मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !