लाचखोर हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात


पुणे : मारामारीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार दादासाहेब नामदेव ठोंबरे (50) यांना एक लाख 10 हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. मारहाणीच्या प्रकरणातून तक्रारदार तरुणाचे नाव कमी करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी दादासाहेब ठोंबरे याने 1 लाख 80 हजार रुपयांची लाच 28 वर्षीय तक्रारदाराकडे मागितली होती. या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी केलेल्या पडताळणीत तोडजोड होऊन ठोंबरे याने 1 लाख 10 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. उपअधीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकाने यांनी सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !