पोलीस अधिकार्यांच्या बदल्या गुरूवारपर्यंत होणार : प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे
मुंबई : उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या सर्वसाधारण बदल्या येत्या गुरुवारपर्यंत होणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी रविवारी आपल्या फेसबुक अकाउंटवरून दिली आहे. उपअधीक्षक ते वरीष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या मात्र 14 ऑगस्टपूर्वी केल्या जातील, गृह मंत्रालयातून त्याबाबतचे आदेश निघतील. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या 25 टक्के बदल्या करण्याबद्दल सामान्य प्रशासन शुक्रवारी अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार 11 बढत्यांसह जवळपास 50 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या होतील. राखीव पोलीस दलातील बदल्या सोमवारी तर त्यानंतर दोन दिवसांत हवालदारांना पदोन्नती दिली जाईल. वायरलेस, श्वानपथक, परिवहन विभागातील अंमलदारांच्या विनंतीवरून करण्यात येणार आहे. त्यानंतर नि:शस्त्र दलातील उपनिरीक्षक, सहा.निरीक्षक व निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारपर्यंत करणार असल्याचे पांडे यांनी जाहीर केले आहे.