जुन्या वादातून तिघांची धारदार शस्त्राने हत्या


सांगली : पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामानी तिघांची हत्या करण्यात आली तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने तालुक्यासह सांगली जिल्हा हादरला आहे. पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील वसंतनगर भागात ही तुफान हाणामारी झाली. अरविंद बाबुराव साठे (वय 60), सनी आत्माराम मोहिते (वय 40), विकास आत्माराम मोहिते (36) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेत स्वप्नील साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश मोहिते हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. घटनास्थळी जिल्ह्यातून पोलिसांची कुमक पाठविण्यात आली आहे. या घटनेने दुधोंडी परिसरात तणावाचे वातावरण तयार झाल. चाकू, गुप्ती, काठ्यांसह अन्य धारदार शस्त्रांसह दगडाचाही वापर करुन हल्ला करण्यात आला. तासभर ही धुमश्चक्री सुरु होती. दोन्ही गटातील दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !