लॉकडाऊन अखेर शिथील : रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा


शनिवारी दुकाने तीन वाजेपर्यंत खुली राहणार तर रविवारी दुकाने पूर्णपणे राहणार बंद

मुंबई : व्यापार्‍यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. सांगलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या नियमात शिथीलता देण्यात आली आहे. राज्यातील 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये नव्या नियमानुसार, आता रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील मात्र शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं सुरू राहतील तर रविवारी दुकाने पूर्ण बंद राहणार असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या नियमावलीनुसार वेळेत वाढ करुन दिली आहे. यानुसार आता सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवता येणार आहेत.

या जिल्ह्यात मात्र निर्बंध कायम
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर,बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये निर्बंध मात्र कायम राहणार आहेत.

नेमकं काय सुरू राहणार?
अत्यावश्यक आणि इतर सर्व दुकानं, शॉपिंग मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत तर शनिवारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रविवारी अत्यावश्यक दुकानं वगळता इतर सर्व आस्थापनं बंद राहणार आहेत.

व्यायाम, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी सार्वजनिक बाग आणि खेळाची मैदानं सुरू होणार आहेत.

शासकीय आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं पण कोरोना संबंधिचे सर्व नियम पाळून कर्मचार्‍यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन शिफ्टचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.

जीम, योगा सेंटर, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा एसी सुरू न ठेवता एकूण 50 टक्क्यांच्या क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहे.

चित्रपटगृह, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील

सर्व धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !