अल्पवयीन मुलाने पित्याचा केला खून
पुसद : घरात कौटुंबिक वाद सुरू असताना अल्पवयीन मुलाने चक्क वडिलांच खून केल्याची घटना शनिवारी रात्री तालुक्यातील बोरी (खुर्द) येथे घडली. या घटनेत पुंजाजी हरसूजी दीपके (45) यांचा मृत्यू झाला. विधी संघर्ष बालकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. मृत पुंजारी दीपके हे आपल्या मुलीस सासरी जा, असे सांगून वाद निर्माण करीत असताना 15 वर्षीय मुलगा संतापला. त्याने संतापाच्या भरात लाकडी काठीने पुंजाजी यांच्या डोक्यावर व अंगावर वार केले. यात पुंजाजी दिपके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात रात्री त्यांचा मृत्यू झाला.