विक्रम मोडीत : बारावी परीक्षेचा 99.63 टक्के निकाल
पुणे : बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला असून या निकालात सर्व विक्रम मोडीत काढले. राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के वाणिज्य शाखेचा 99 .91 टक्के तर कला शाखेचा 99.83 लागला.शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 46 तर 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहे. कोकणचा सर्वाधिक 99.81 टक्के आणि औरंगाबाद 99.34 टक्के सर्वात कमी असा निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात 8.97 टक्के वाढ झाली आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी एक संधी उपलब्ध राहिल, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून मंगळवारी जाहीर केल्या जाणा-या इयत्ता बारावी निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवता येणार असून विभागीय मंडळ स्थरावरून संबंधित तक्रारींचे निराकर केले जाणार आहे,असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.