मोठी बातमी : पारंपरीक अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही : बारावी गुणांच्या आधारे मिळणार प्रवेश
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परीषदेत माहिती
पुणे : इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारेच राज्यातील महाविद्यालयांमध्ये पारंपरीक अभ्यासक्रमाच्या प्रवेश देण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाही, अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परीषदेत दिली. या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी व महाविद्यालयांचे पुढील सत्र ऑफलाइन पद्धतीने सुरू व्हावे, याबाबत येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.