पिस्टल दाखवणारा व्हिडिओ व्हायरल : अमरावतीच्या पोलिस कर्मचार्‍याचे निलंबन


अमरावती : अमरावती पोलीस दलातील पोलीस अंमलदार महेश मुरलीधर काळे यांच्यावर सोशल मिडीयावर पिस्टल दाखवत तयार केलेला व्हिडिओ तयार प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलीस महेश मुरलीधर काळे यांनी हा व्हिडीओ केला होता. पोलिसाच्या खाकी वर्दीत हातात पिस्तुलासारख्या शस्त्राचा वापर करुन, बुलेटवरुन काही डायलॉग असलेला व्हिडीओ त्यांनी तयार केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओची पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी दखल घेत बेशिस्त आणि गैरवर्तनाबद्दल महेश काळे यांना निलंबीत केले. पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असताना आपण आपलं भान जपलं पाहिजे. लोकांनी पोलीस हे आपल रक्षणकर्ते वाटले पाहिजे, अशा भावनेतूनच काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !