पाच हजारांची लाच भोवली : जलसंपदा विभागातील उपविभागीय अभियंत्यासह खाजगी पंटराविरोधात गुन्हा


पुणे : मेडिकल बील मंजुरीसाठी पाच हजारांची लाच मागणार्‍या जलसंपदा विभागातील उपविभागीय अभियंता संजय मेटे यांच्यासह खाजगी पंटर पोपट शिंदे यांच्याविरोधात लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने जलसंपदा विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. उपविभागीय अभियंता संजय नारायण मेटे (भीमा उपसा सिंचन प्रकल्प, पलसदेव, ता. इंदापूर) आणि पोपट दशरथ शिंदे (रा.बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. तक्रारदार हे भीमा उपसा सिचंन प्रकल्पाच्या कार्यालयात कार्यरत आहेत.

आरोपींना ट्रॅपचा आला संशय
तक्रारदाराचे मेडिकल बिल मंजुरीसाठी आरोपी संजय मेटे यांनी पाच हजारांची लाच मागितली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी सापळा लावण्यात आला होता. मात्र, आरोपींना संशय आल्याने ते लाच स्वीकारण्यासाठी आलेच नाहीत. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने दोघांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !